उल्हासनगरात 300 बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय;खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार | Palava News

0
258

 

उल्हासनगर दि.17 जून : कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरमध्ये कोविड रुग्णांच्या उपचाराठी सत्य साई प्लॅटिनियम रुग्णालयात 300 बेडची सोय करण्यात आली आहे. हे रुग्णालय डेडीकेटेड कोविड रुग्णालय असणार आहे. अवध्या दहा दिवसात हे रुग्णालय उभे झाले असून पहिल्या टप्प्यात 200 बेड सज्ज आहेत. तर आवश्यकता भासल्यास, रुग्ण वाढल्यास आणखीन 100 बेडची तयारी ठेवली आहे.

200 बेडवरील रुग्णांना ऑक्सीजनची सुविधा आहे. तसेच 30 बेडला व्हेटिंलेटरची सुविधा पुरविण्यात आली आहे. याशिवाय कोविड झालेल्या आणि डायलेसिस असलेल्या रुग्णाला अन्य रुग्णालयात डायलेसिस केले जात नाही. डायलेलीस कोविड रुग्णही या रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. सहा डायलेसिस रुग्णांकरीता ही सोय याठिकाणी उपलब्ध आहे. ऑपरेशन थिएटरची सुविधा याठिकाणी आहे. या रुग्णालयात वैद्यकीय स्टाफही देण्यात आला आहे. 12 डॉक्टर, 40 नर्स आणि अन्य 120 जणांचा स्टाफ याठिकाणी रुग्णसेवा करणार आहे.

ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, कल्याण या ठिकाणी कोविड रुग्णालये उभी केली जात आहे. त्याठिकाणी वैद्यकीय स्टाफची कमी होऊ नये यासाठी नर्सना दुप्पट पगार दिला जात आहे. त्यामुळे स्टाफची कमतरता भासणार नाही अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. यावेळेस सदर रुग्णालयाची पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे, शिवसेना सभागृह नेते राजेंद्र चौधरी, उपमहापौर भगवान भालेराव, नगरसेवक धनंजय बोराडे, नगरसेवक अरुण आशाण उपस्थित होते.

Source link