ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मानसिकता बनवणे आवश्यक : शिक्षणअभ्यासक बिपीन पोटे | Palava News

0
514

कल्याण दि.17 जून :
प्रत्येक संकट हे नेहमीच एक मोठी संधी घेऊन येत असतं. ही संधी आपल्याला कोरोनाने दिली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी आपली मानसिकता बनवणे आवश्यक असल्याचे मत सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी व्यक्त केले आहे. ‘शिक्षण – ऑनलाईन की ऑफलाईन’ या विषयावरील वेबिनारमध्ये पालकांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
चांगले पालकत्व आणि चांगले शिक्षण या 2 गोष्टी एकत्र आल्या तर खूप चांगलं काम करता येऊ शकतं. मुलाना चांगलं शिक्षण देणे हे शाळेबरोबरच पालकांचेही कर्तव्य आहे. ऑनलाईन शिक्षणात मुलाना शिकताना लाईव्ह बघण्याची संधी या संकटाने उपलब्ध करून दिली असून याबरोबरच आपल्या मुलांना समजून घेण्याचीही संधी उपलब्ध झाल्याचे बिपीन पोटे यांनी सांगितले.
तर ऑनलाईन शाळा झाल्या नाहीत तर मुलं मोबाईलला हात लावणार नाही का? आता मोबाईल वापरत नाहीत का? मात्र ऑनलाईन शाळा सुरू झाल्या नाहीत तर मुलाना चुकीच्या सवयी लागू शकतील, त्यांची मानसिकता बिघडू शकते अशी भितीही पोटे यांनी यावेळी व्यक्त केली.
तर आताची नविन पिढी ही अशी आहे की त्यांना तंत्रज्ञानाची कोणतीही अडचण नाहीये. मोबाईल असो की कोणतेही गॅझेट ही नविन पिढी अत्यंत सहजपणे हाताळत आहेत. त्यामूळे आज कोरोनाने आणलेले संकट हे एक मोठी संधी असून पालकांनीही आपली मानसिकता सकारात्मक बनवण्याचा सल्लाही बिपीन पोटे यांनी यावेळी दिला.
या वेबिनारमध्ये त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, मुलांचे भविष्य, पालकांची कर्तव्य आणि जबाबदारी, शाळांची भूमिका आदी महत्वाच्या मुद्द्यांवर सखोलपणे मार्गदर्शन केले.

Source link