जय जिजाऊ जय शिवराय

0
115


🚩🚩

नमस्कार,

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा उत्सव आपले सन्माननीय आमदार श्री.प्रमोद (राजू) रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १९ फेब्रुवारीला, शुक्रवार या दिवशी मोठया उत्साहात साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण ही आपल्या जाणत्या राज्याच्या ह्या उत्सवात सामील होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. व त्यादिवशी छत्रपतींच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन सर्व वातावरण हे शिवमय करावे.

स्थळ : श्री गणेश मंदिर, कासा रिओ-पलावा
वेळ : सकाळी ०७:०० ते रात्री १०:०० पर्यंत

टीप: सामाजिक अंतर राहील याची काळजी घ्यावी व
तोंडाला मास्क लावणे हे अनिवार्य राहील.

धन्यवाद,
एकता प्रतिष्ठान-पलावा.