नमस्कार, कासा रिओ पलावा व आसपासच्या परिसरात क्रिकेटचे वातावरण हे चांगलेच रंगले आहे व का

0
161

नमस्कार🙏🏻,
कासा रिओ पलावा व आसपासच्या परिसरात क्रिकेटचे वातावरण हे चांगलेच रंगले आहे व कासा रिओ क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या रिओ युनीटी कप (RUC) मध्ये सर्व खेळाडूंचा उत्साह हा देखील खूप आनंददायी आहे पण सध्य परीस्थितीला अनुसरून क्रिकेट खेळताना कोविड-१९ ह्या आजरा विषयी विशेष खबरदारी घेऊन मैदानात खिलाडू वृत्तीने सर्व खेळाडूदेखील खेळ सादर करीत आहेत.
ह्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंचा उत्साह हा असाच कायम राखण्यासाठी आणि खेळभावना ही जपली जावी.
ह्या साठी आपले लाडके आमदार श्री. प्रमोद (राजू दादा) रतन पाटील यांनी त्यांचा तर्फे क्रिकेट बॅट्स देऊ केल्या आहेत. पण एकता प्रतिष्ठानने त्या बॅट्सवर राजु दादांच्या स्वाक्षरीचा (सही) आग्रह केला होता. म्हणून राजु दादांनी सर्व बॅट्स वर स्वतःची स्वाक्षरी करून त्या बॅट्स खेळाडूंना भेट देण्याकरता एकता प्रतिष्ठान-पलावा कडे सुपूर्त केल्या. व त्या बॅट्स प्रतियोगीतेचा शेवटच्या दिवशी खेळाडूंना वितरित करण्यात येणार आहेत.
यासाठी आम्ही राजु दादांचे खुप खुप आभारी आहोत🙏🏻 व आपल्या अशा सहकार्यामुळे एकता प्रतिष्ठान व त्याच्या सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन मिळते.
धन्यवाद
एकता प्रतिष्ठान-पलावा.

May be an image of 2 people, people standing and indoorMay be an image of indoorMay be an image of indoorMay be an image of 3 people, people standing and indoor