महापालिकेने आपले स्वतःचे व्हेंटिलेटर विकत घ्यावे – भाजप नगरसेवक वरुण पाटील | Palava News

0
310

कल्याण दि.17 जून :
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने आपले स्वतःचे व्हेंटिलेटर विकत घेण्याची मागणी भाजप नगरसेवक वरुण पाटील यांनी केली आहे. आज झालेल्या स्थायी समितीसभेमध्ये त्यांनी याबाबत मुद्दा उपस्थित करून ही मागणी केली.

गेल्या 4 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत दररोज 100 हुन अधिक कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता महापालिकेला मोठ्या संख्येने व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी काही सुसज्ज खासगी रुग्णालयांशी करारही केला आहे. तरीही महापालिकेकडे स्वतःचे हक्काचे व्हेंटिलेटर असणे कधीही चांगले असल्याचे सांगत महापालिकेने 50 व्हेंटिलेटर विकत घेण्याची मागणी वरुण पाटील यांनी यावेळी केली. या मागणीवर आता काय निर्णय घेतला जातो हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

Source link