डोंबिवली दि.30 मे:
कोरोनाचे संकट असले तरी पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे महापालिका आणि एमआयडीसी क्षेत्रातील नालेसफाईची कामे कासवगतीने सुरु आहे. महापालिका आणि एमआयडीसी कडून मान्सून पूर्व तयारीची कामे वेगाने होत नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी आमदार राजू पाटील यांच्याकडे केल्या होत्या.त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली निवासी भागातील रस्त्यांची आणि नालेसफाईची पाहणी केली आहे.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर सर्वच महत्वाची कामे ठिकाणी ठप्प झाली आहेत. मात्र पावसाळा काही दिवसांवर आला तरी कल्याण डोंबिवली महापालिकेची नालेसफाईची कामे संथ गतीने चालू आहे.एमआयडीसी निवासी विभागातील रस्त्यावर सर्व ठिकाणी खड्डे पडले आहेत.मात्र अद्याप ते बुजवले गेले नाहीत.एमआयडीसी कडून गटारांची कामे अर्धवट आहेत.त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी एमआयडीसी निवासी विभागाचा पाहणी दौरा केला.यावेळी स्थानिक रहिवाश्यांकडून समस्या जाणून घेतल्या आणि नालेसफाईची कामे वेगाने करा, खड्डे तातडीने बुजवा अशा सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लॉकडाऊनमध्ये कामे बंद होती. मात्र आता ती सुरवात करा, काही दिवसात पावसाला सुरवात होईल असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी एमआयडीसीचे उपअभियंता दीपक पाटील ,सहाय्यक अभियंता एस.एस.शुक्ल , केडीएमसीचे प्रभाग क्षेत्र अधिकारी नरेंद्र धोत्रे, मनगुंडे , उपअभियंता वाघमारे उपथित होते. मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत , भाजपा पदाधिकारी नंदू परब, सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे, संदीप म्हात्रे तसेच मनसे आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.