कल्याण दि.9 जून :
अनलॉक 1 नूसार कालपासून सर्व कार्यालये सुरू झाल्याने कामावर जाण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. मात्र लोकलसेवा बंद असल्याने या लोकांनी आपला मोर्चा एसटी डेपोकडे वळवला असून कल्याण एसटी डेपोमध्ये आज सकाळी भयानक गर्दी पाहायला मिळाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या सर्वोच्च टोकावर असताना दुसरीकडे शासनाने अनलॉक 1 नूसार लॉकडाऊन शिथिल केले. टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय सुरू करत कालपासून खासगी कार्यालयेही सुरू झाली. मात्र कामावर जाण्यासाठी लोकांचा प्रमूख पर्याय असणारी रेल्वेसेवा मात्र अद्यापही बंदच आहे.परिणामी या चाकरमान्यांनी लालपरी म्हणजेच एसटीकडे आपला मोर्चा वळवला आहे. कल्याण एसटी डेपोमध्ये आज तोबा गर्दी झालेली पाहयाल मिळाली. कोणतेही सोशल डिस्टन्स नाही की सुरक्षित अंतर नाही. नेहमीप्रमाणे गाड्या पकडण्यासाठी धक्काबुक्की आज पाहायला मिळाली.
एकीकडे आपल्या सर्वोच्च स्थानावर पोहचलेला कोरोना, शिथिल केलेले लॉकडाऊन आणि सुरू झालेली कार्यालये या पार्श्वभूमीवर लोकांची कामावर जाण्यासाठी लोकांची होणारी गर्दी हे चित्र नक्कीच कोरोनाला रोखण्यासाठी सकारात्मक नाही. एवढं नक्की