कल्याण दि.29 मे :
कल्याणातील चव्हाण फाउंडेशनतर्फे गेल्या काही दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रक्तदान शिबिर, गरजवंतांसाठी जेवणाची व्यवस्था, रोगप्रतिकारशक्ती वाढणाऱ्या औषधांचे वाटप आदी लोकोपयोगी काम लॉकडाऊनच्या काळात सुरू आहे.
लॉकडाऊनमूळे लोकांना होणारा त्रास पाहून कल्याणातील नामांकित बांधकाम व्यावसायिक मिलिंद चव्हाण यांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार चव्हाण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन आतापर्यंत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.
नुकतेच एक भव्य आरोग्य शिबीर आयोजित करून त्यामध्ये शेकडो लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कल्याण पश्चिमेत एकाच वेळी 5 ठिकाणी हे शिबीर भरवण्यात आल्याची माहिती मिलिंद चव्हाण यांनी दिली. त्याचसोबत शिबिरात सहभागी झालेल्या लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सूचित केलेल्या अरसेनीक गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. तर आतापर्यंत सुमारे 3 हजार गरजू लोकांच्या एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासह 1 हजार लोकांना संस्थेतर्फे अत्यावश्यक वस्तूंचे किट देण्यात आल्याचेही मिलिंद चव्हाण यांनी सांगितले.