“संत रविदास महाराज” यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आज सहा.आयुक्त, हेमा मुंबरकर यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य, इतर पदाधिकारी व समाज बांधव आणि महापालिका कर्मचारी यांनी देखील संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.