मुंबई दि.13 जून :
कोरोना चाचणीबाबत राज्य सरकारने नविन दर लागू केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेनेही याबाबतचा आदेश काढून पालिका क्षेत्रातील लॅबना नव्या दरानुसार चाचण्या करणे बंधनकारक केले आहे.
कोवीड चाचण्यांचे दर कमी करण्याबाबतच्या सूचना केंद्राच्या आयसीएमआरने राज्याला दिल्या होत्या. त्यानूसार हे नविन दर लागू करण्यात आले असून आता खासगी लॅबना रुग्णालयांतून घेतलेल्या स्वॅब नमुन्यांसाठी २ हजार २०० रुपये आकारता येणार आहेत. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅबचे नमुने घेतल्यास त्यासाठी २ हजार ८०० रुपये आकारता येतील. याआधी याच कामासाठी ४ हजार ५०० आणि ५ हजार २०० इतके दर आकारले जात होते.
सरकारने जाहीर केलेले हे दर खासगी लॅबसाठी बंधनकारक असणार आहेत.