कल्याण दि.5 जून :
कोरोनाचा परिणाम शाळा- विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरही होताना दिसत आहे. तसेच सर्वत्र लॉकडाऊनमूळे शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये कुठेही खंड पडू नये या उद्देशाने ‘ई लर्निंग स्कूल’चा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कुणाल पाटील फाऊंडेशन आणि औक्सीलियम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. या ईस्कूलचे उद्घाटन कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याअंतर्गत ज्यू.केजी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स सुरु केले असून याला विद्यार्थ्यां-पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत ई स्कूल मध्ये ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यासाठी इंग्लिश, मराठी, हिंदी, गणित व विज्ञान ह्या विषयासाठी ५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. झूम अॅपद्वारे हे ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहेत.
सध्या लॉकडाऊनमुळे शाळा आणि विद्यार्थी यांचा संपर्क होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला असून त्याला विद्यार्थ्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांना या ई लर्निंग स्कूलचा लाभ घ्यायचा असल्याचा ९६८९१५३८०२,९५६१८५७३०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.