कोरोनाच्या मुकाबल्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाला ३६ कोटींचा अतिरिक्त निधी – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती | Palava News

0
208

ठाणे दि.17 जून :
करोना साथीच्या मुकाबल्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आवश्यक ती आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून राज्य सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा, तर नगरविकास आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून २६ कोटी असा एकूण ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

महसूल विभागाच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महापालिकेला १० कोटी तर नगरविकास विभागामार्फत ठाणे 4 कोटी 96 लाख, उल्हासनगर ७ कोटी, कल्याण-डोंबिवली ७ कोटी, अंबरनाथ ७ कोटी असा २५ कोटी ९६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

ठाण्यासह संपूर्ण एमएमआर परिसरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून आरोग्यव्यवस्था बळकट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या महापालिका/नगरपालिकांना पुरेसे आर्थिक पाठबळ देण्याची मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार महसूल विभागामार्फत वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच नगरविकास खात्याच्या मार्फतही निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने कोरोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळेल असा विश्वास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Source link