कल्याण दि.14 जून :
युनायटेड वे मुंबईतील या सेवाभावी संस्थेने विविध क्षेत्रातील पाच ते सहा कॉर्पोरेट कंपन्यांच्या मदतीने कोरोनाच्या पादुर्भावात सामाजिक भान राखून कल्याण आणि डोंबिवलीमधील पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.
त्याचबरोबर मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आदी शहरातील विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या गरजूंना आणि गोरगरीब, मध्यमवर्गीयांना महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू असलेले किट देण्यात आले. युनायटेड वे या सेवाभावी संस्थेचे डायरेक्टर अजय गोवले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनश्री मंत्री आणि रवींद्र आरवेल यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकारी मोनिका गुरसिंघानी यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षात कल्याणमधील विविध वृत्तपत्रातील सुमारे ५२ पत्रकारांना संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले.
दरम्यान सामाजिक बांधिलकी बाळगून कोरोना महामारीत केलेल्या या मदतीबद्दल कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील इतर सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले आहेत.