कल्याण दि.16 जून :
कल्याणातील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.पापा काझी यांचे आज निधन झाले. ठाण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कल्याणातील एक नामवंत आणि कायद्यातील निष्णात व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. तर ते आपल्या करारी आणि स्पष्टवक्तेपणासाठीही परिचीत होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, विधीज्ञ क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एलएनएन परिवारातर्फेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.