कल्याण दि.31 मे :
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांना पीपीई किट देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानूसार कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याणातील खासगी डॉक्टरांसाठी 300 पीपीई किटचे नुकतेच वाटप केले.
शासकीय डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही पीपीई किट पुरवले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले आहे. त्यानुसार कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून कल्याण डॉक्टर्स आर्मीकडे हे चांगल्या दर्जाचे पीपीई किट सुपूर्द केले. तसेच आमदार भोईर यांनी कल्याणातील कोवीड हॉस्पिटल असणाऱ्या हॉलीक्रॉसला भेट देऊन तिथल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले. या पीपीई किटमुळे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.