कल्याण दि.10 जून :
कल्याण पश्चिममध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून त्यावर उपाययोजना करत कोरोनामुक्त परिसर राहील याकडे लक्ष दिले जात आहे. वॉर्ड क्र. 21 फडके मैदान परिसरात भाजपा महिला सरचिटणीस प्रिया शर्मा यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फडके मैदान परिसरातील प्रथमेश अपार्टमेंट, गुरुदेव सोसायटी, श्रीहंसा, देवी आशिष सोसायटी, तिर्थधाम, नीलकंठ व्हॅली, सुभाष नगर, महाराष्ट्र नगर, आंबेडकर नगर, शिंदे मळा आदी ठिकाणी सॅनिटायझरने फवारणी पूर्ण केली असून सोबतच गरजूंना मास्क वाटप, अन्नधान्य वाटपही मोठ्या प्रमाणात केले आहे. कोरोनाचा प्रादुभाव थांबविण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करत आहेत.
फडके मैदानमधील सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन केंद्रीय आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप सुरू आहे. नागरिकांना या गोळ्या देत आवश्यकता त्या सूचना व जनजागृती केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सोसायटीच्या आवारात भाजीपाला आपल्या दारी या उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छ आणि ताजी भाजी स्वस्त दरात उपलब्ध करून दिली होती. या आजाराला सकारात्मक राहून आणि चोखपणे सूचना पाळून, काळजी घेऊन आपण परतून लावू शकतो, नागरिकांनीही सूचना पाळल्या पाहिजेत व आवश्यकता असेल तर बाहेर पडले पाहिजे असे आवाहन यावेळी बोलताना भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रिया शर्मा यांनी केले.
या सर्व कामामध्ये अजिंक्य पवार, शीतल आचार्य, स्वरूपा चव्हाण, आशिष झाडे, अरुण रजपूत, राधा झा, जोशी मॅडम, जयेश ठाकरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे मदत करत आहेत.