कल्याण दि.7 जून :
राज्यासह कल्याण शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मात्र हा आकडा लक्षात घेऊन सापाड आणि उंबर्डे परिसर कोरोनामुक्त राहिला पाहीजे यासाठी भाजपा युवा नेते राहुल भोईर यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उंबर्डे – सापाड परिसरात सामाजिक जबाबदारी ओळखून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सापाड – उंबर्डे परिसरातील सर्वांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या, गरजूंना धान्य व भोजन वाटप केले असून. भंडारी आळी, पाटील आळी अशा अनेक सोसायटी व इतर महत्वाच्या ठिकाणी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून सॅनिटायझरने फवारणीदेखील पूर्ण केली आहे. कोरोनापासून काळजी घेण्याच्या अनुषंगाने जनजागृतीही केली जात आहे. दरम्यान नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, व्यवस्थित काळजी घेऊन हा आजार आपण निश्चितपणे परतून लावू शकतो असा विश्वास राहुल भोईर यांनी व्यक्त केला.
या सर्व कामांमध्ये शालीक भोईर, विजय पाटील, सुनील थळे, उमेश घोडे, चिंतामण लोखंडे, छोटूलाल पाटील,निकिता पाटील,योगिता भंडारी व भाजपा कार्यकर्ते सक्रियपणे काम करीत आहेत.